सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन सोफ्टवेर
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय गडचिरोली आपले सहर्ष स्वागत करीत आहे.
माझी शाळा माझा अभिमान मध्ये सर्व शिक्षकाचे स्वागत
आश्रम शाळा गुणवत्ता चळवळ मध्ये आपले स्वागत आहे.मी श्री तुकाराम मुरलीधर सोनकुसरे प्राथमिक शिक्षक शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा रांगी ता. धानोरा जिल्हा. गडचिरोली माझ्या स्वतःच्या शैक्षणिक नवोपक्रमातील एक महत्वाचा प्रयत्न म्हणजे शैक्षणिक कार्यात तंत्रज्ञानाचा वापर करून चांगल्यात चांगले शैक्षणिक कार्य तेही कमी वेळात करता यावे या उद्देशाने आपल्यासाठी महत्वाचा शैक्षणिक कार्य म्हणजे आपले विध्यार्थ्याचे मूल्यमापन. शैक्षणिक मुल्यामापानातील महत्वाचे म्हणजे सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन होय.
सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन
इयत्ता पहिली ते आठवी साठी आटोमॅटिक निकाल तयार करण्यासाठी चा महत्वाचा सॉफ्टवेअर.
यामध्ये सर्वच निकाल A 4 साईज पानावर तयार होतो त्यामध्ये महत्वाचे म्हणजे ऑनलाईन निकाल पब्लिश करण्यासाठी मदत मदत होते.
सर्व बाबी आटोमॅटिक तयार होतात
1) प्रथम सत्र निकाल पत्रक
2) द्वितीय सत्र निकाल पत्रक
3) वार्षिक निकाल पत्रक
4) प्रत्येक विद्यार्थ्यांचे सेपरेट प्रगती पत्रक
5) प्रत्येक विद्यार्थ्यांचे निकाल नोंदणीपत्रक
6) प्रत्येक विद्यार्थ्याचे वर्णनात्मक नोंदवही
7) प्रत्येक विद्यार्थ्याचे विशेष नोंदी
8) प्रत्येक विद्यार्थ्याचे आवश्यकतेनुसार स्वतःच्या नोंदी लिहिण्याचे माध्यम
9) ऑटोमॅटिक पेज सेटअप च्या सहाय्याने प्रिंट काढण्यास आणि पीडीएफ बनवण्यास सोयीस्कर
10) स्वताच्या वर्गाचा निकाल ऑनलाईन प्रकाशित करण्यासाठी महत्त्वाची मदत
11) स्वतःच्या वर्गाचा निकाल जतन करून ठेवण्यासाठी सर्वात लहान अशी फाईल साईज फक्त 2.5 एम. बी.
या सर्व बाबीचा आपल्याला उपयोग करता येईल यासाठी लवकरच आपल्या ग्रुप वरती ऑनलाइन कार्यशाळा घेण्यात येत आहे त्यासाठी मार्गदर्शक म्हणून trti pune येथील टेक्नो सुलभक याद्वारे ही कार्यशाळा लवकरच आयोजित करत आहोत.
मार्गदर्शक
सचिन सर
पंकज सर
प्रदीप सर
सुधाकर सर
तुकाराम सर
या ऑनलाइन कार्यशाळेचा सर्वांनी फायदा घ्यावा त्यासाठी तुम्हाला JITSI MEET ऍप डाऊनलोड करून ठेवावे लागेल.
धन्यवाद
आपला शिक्षक मित्र
तुकाराम मुरलीधर सोनकुसरे
सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन सोफ्टवेर वापरताना खालील सूचना काळजीपूर्वक प्रथम दर्शी समजून घ्या.
- प्रत्येक विध्यार्थ्याची माहिती दाखल खारीज क्रमांकासाहित अचूक पूर्ण माहिती भरा.
- प्रथम सत्र माहिती भरताना प्रथम कुठल्या वर्गासाठी, विषयासाठी संकलित व आकारीत मुल्यांकन भारांश किती द्यायचा ते ठरवून घ्या. त्या नंतर प्रत्येक साधनाला किती गुण द्यायचे ते ठरवल्यानंतर पैकी गुण प्रत्येक विषयाची सेटिंग करून घ्या. त्या नंतर प्राप्त गुण भारणे चालू करा. गुण भरून झाल्यानंतर जसे जसे समोर गेल्यानंतर, आवश्यक सुधारणा, विशेष प्रगती, आवड/ छंद, आवश्यक सुधारणा, या नोंदीची माहिती भरायची आहे त्या मध्ये आपल्याला ड्रोप डोव्न मधून आवश्यक त्या नोंदी निवडायच्या आहेत. त्यानंतर प्रत्येक विषयाच्या कमाल नोंदी प्रत्येक विषयासाठी ४ आहेत त्या तुम्ही नोंदी त्यामधून निवड करू शकता. नाहीतर तुम्हाला तुमच्या स्वतःच्या लिहाव्या वाटल्यास प्रथम सत्र, द्वितीय सत्र नोंदी येथे लिहून घ्या. या tab वरती जाऊन त्या नोंदी लिहून घ्या. आणि नंतर प्रथम सत्र, द्वितीय सत्रासाठी स्वतःच्या नोंदी ड्रोप डोव्न मधून त्या त्या मुलासाठी निवडून घ्या.
- द्वितीय सत्र पण असेच करायचे. फक्त प्रकल्प साधनाचे पैकी गुण निवडताना फक्त त्या मुलासाठी कुठल्या विषयाचा प्रकल्प दिला आहे तेवढेच सेटिंग करा . नंतर च्या मुलासाठी पहिले सारखी सेटिंग करा. हि सेटिंग खूप महत्वाचे आहे.
- त्या नंतर तुमचा निकाल खालील प्रपत्रात तयार झालेला असेल.
- प्रथम सत्र निकाल tab ला click करून फक्त जेवढ्या मुलांचा नाकील तुम्ही बनवला आहे . तेवढी file select करून प्रिंट काढा किव्हा pdf बनवा. सर्व सेटिंग ए 4 साईझ page सेटिंग आहे.
- द्वितीय सत्र निकाल पण असेच प्रिंट करायचे.
- आता प्रत्येक मुलांची नोंदवही साठी प्रथम सत्र द्वितीय सत्र नोंद वही या tab ला click करा नंतर प्रत्येक मुलाचा दाखल खारीज क्रमांक उजवीकडील search मध्ये टाकून प्रत्येक मुलांचे नोंदवही निकाल पत्रक प्रिंट करून घ्या.
- आता वर्णनात्मक नोंदी वही प्रिंट करण्यासाठी वर्णनात्मक नोंदवही प्रथम सत्र / द्वितीय सत्र या tab वर click करून वरच्या प्रकारेच कार्यवाही करा. या मध्ये आपल्या मुलांची निकाल नोंदवही व वर्णनात्मक नोंदवही एकाच page चा वापर करून मागे पुढे प्रिंट काढू शकता. त्या मुले page कमी लागतील आणि file बनवायला सोप होईल.
- त्यानंतर वार्षिक निकाल पत्रक या tab वरती जाऊन जेवढे विध्यार्थी आपले आहेत तेवढी file select करून प्रिंट काढून घ्या.
- नंतर प्रोग्रेस कार्ड साठी पण असेच करायचे फक्त यामध्ये सुद्धा मुलाचा दाखल खारीज नंबर आवश्यक आहे. उजवीकडील बाजूला असलेल्या डब्यात तो टाकून प्रोग्रेस कार्ड ची प्रिंट काढून घ्या.
- तयार झालेला आपला सर्व निकाल आता आपल्या google drive ला life time सेव करून ठेवा.
- C.C.E. SOFTWARE MANUAL
HERE
TOUCH MY SCHOOL LOGO AND WATCH
आपला CCE SOFTWARE खाली आहे त्याला download करण्यासाठी खालील download icon ला click करा.
THANKS FOR USING
PLEASE COMMENT
CCE SOFTWARE kadhi milnar ani kuth milnar sir
ReplyDelete